तेर (प्रतिनिधी)- देशभक्ती अंतःकरणातून असली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक अजय जानराव यांनी केले.
तेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरू पूजन कार्यक्रम प्रसंगी अजय जानराव बोलत होते.यावेळी तालुका कार्यवाहक योगेश लोमटे,तेर येथील कार्यवाहक बालाजी चादरे हे उपस्थित होते. पुढे बोलताना जानराव म्हणाले की, हिंदूनी एकत्र येऊन संघटीत होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली.प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय भाव असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागरण गट प्रमुख नागनाथ कचार यानी केले.यावेळी जिल्हा शारीरिक प्रमुख विलास टेळे व मोठ्या संख्येने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते.