उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील कराळी - तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्रावण मासानिमीत्त 23 दिवशीय श्रीहरी भजनसेवा पर्वाचे आयोजन गुरूवार दि. 13 ऑगस्ट पासून गोकुळाष्टमी शुक्रवार दि. 5 सप्टेंबर पर्यंत करण्यात आले आहे. 

श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्रावण महिन्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत 23 दिवशीय भजनसेवा पर्वाचे आयोजन केले आहे.  सदगुरू काशिनाथ महाराज यांच्या सान्निध्यात व हभप. श्री. गुरूवर्य उज्वलानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्रावणातील दर सोमवारी सायंकाळी  7 ते 9 या वेळेत किर्तन होणार आहे. उर्वरित दिवशी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत किर्तन सेवा होणार आहेत. यात सोमवार दि. 17 रोजी हभप. जनार्दन महाराज भोसले श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान, सोमवार दि. 24 रोजी हभप. ज्ञानेश्वर महाराज बरमदे हासोरी, गुरूवार दि. 27 रोजी पौर्णिमेनिमित्त हभप. चंद्रकांत महाराज दिक्षित कारूंडे,  सोमवार दि. 31 रोजी हभप. भिम महाराज श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थान, गोकुळाष्टमी शुक्रवार दि. 4 रोजी रात्री 10 ते 12 या वेळेत हभप. दिपक महाराज श्री क्षेत्र अमरबेट देवस्थान तर  गोपाळकाला शनिवार दि. 5 रोजी हभप. हरी गुरूजी लवटे महाराज श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान यांचे किर्तन सेवा होणार आहे. 

देवस्थान येथे श्रावणात दररोज भजनसेवा होणार आहे. पंचक्रोशीतील 250 गावातील भजनी मंडळे सेवा करणार आहेत. यात गुरूवार दि. 13 रोजी उर्की, वडरगा, चिट्टा ( का ), तडोळा, ञिपुरांत, शुक्रवार दि. 14 रोजी कोळसुर ( क., गु. ) चिंचकोट ( ल. ), शनिवार दि. 15 रोजी बंजारा भजन - तुरोरी तांडा, मुळज तांडा, दाळींब तांडा, कराळी तांडा, होदलुर तांडा, चिट्टा तांडा, गदलेगाव तांडा, बलसुर तांडा, कोळसुर तांडा, वाडी तांडा, तलमोड तांडा. रविवार दि. 16 रोजी एकोंडी ( ज. ), चिंचोली ( ज. ), नेलवाड, हिप्परगाराव, बडूर, शिरगुर., नागपंचमी सोमवार दि. 17 रोजी बाबळसूर, बाबळसूरवाडी, सावळसुर, नारंगवाडी, मातोळा, बोरी, कोरेगाव., मंगळवार दि. 18 रोजी कोळेवाडी ( चा ), हंद्राळ ( वाणी), सांगवी ( भि. ), बेडगा, मोरखंडी, संगीत भ. मं. व महादेव भ.मं. उमरगा., बुधवार दि. 19 रोजी हासोरी ( खु.), हासोरी ( बु. ), हरीजवळगा, भोसगा, दाबका, शाबीदवाडी, माने गोपाळ, ताडमुगळी., गुरूवार दि. 20 रोजी मुळज - हनुमान व विठ्ठल भ. मंडळ, भगतवाडी, तळीखेड, कदमापूर, टाकळी, अनसरवाडा., शुक्रवार दि. 21 रोजी मिरगाळी, शिराढोण, बालकुंदा ( का.), सरदार वाडी, चांदोरी, चांदोरीवाडी, ममदापूर, भक्ती साधना महिला भजनी मंडळ उमरगा., शनिवार दि. 22 रोजी गुंजोटी, मळगी, एकंबा, गदलेगाव, हंगरगा ( शि. ), हंद्राळ  ( आर ), आष्टा ( जा ), गुरूवाडी, पारसखेडा. रविवार दि. 23 रोजी विष्णू मंदिर, सोनवणे हनुमान मंदिर भ.मं. कवठा, भुतमुगळी, बोळेगांव, चिंचोली ( स ), जोगेवाडी, नवचंदवाडी, मदारवाडी, रामतीर्थ ( क. )., सोमवार दि. 24 रोजी भकनाळ, चिंचकोट ( भ ), शिरूरी, चौकीवाडी, कोरेगाव वाडी, मोगरगा., मंगळवार दि. 25 रोजी सावनगिरा, वडगाव, उजळंब, मुदगडवाडी, गुंजोटीवाडी, धाकलीवाडी, अंबुलगा ( चि. ), मुदगड ( रा. ), कसगीवाडी., बुधवार दि. 26 रोजी नवचंदवाडी, मदारवाडी, वाकसा, चंडकाळ, कोंगळी, डिग्गी., 

नारळी पौर्णिमा गुरूवार दि. 27 रोजी शिरुर, कोयाजीवाडी, लिंबाळा ( दा. ), संगारेड्डीवाडी, सगरेवाडी, कलांडी, केळगाव, सरजवळगा., रक्षाबंधन शुक्रवार दि. 28 रोजी नागराळ, घोटाळ, बंडगरवाडी, तळभोग, येळी, दादगी, कुन्हाळी, चिंचोली ( भु,भं. ), आळंगा., शनिवार दि. 29 रोजी रामतीर्थ ( आर), निरगुडी, निरगुडी, नारायणपूर, लाडवंती, विश्वकर्मा भ. मं. निलंगा, श्री तुकाराम महाराज भजनी मंडळ निलंगा., रविवार दि. 30 रोजी ञिकोळी, गुगळगाव, नदी हत्तरगा, कोराळी, दगड धानोरा, कोकळगाव, पेठ सांगवी.

सोमवार दि.31 रोजी हालसी ( ह.), हालसीवाडी, हत्तरगा ( हा.), कोराळ, औंढा, पौळ अंबुलगा, आनंदवाडी, कोळगाव सांगवी., मंगळवार दि. 1 रोजी गुंजरगा, येळणूर, सावरी, व्होणाळी, रामतीर्थ डी, मानेजवळगा, फुलदरवाडी, तगरखेडा, बेंडगा, बुधवार दि. 2 रोजी जामगा, शेळगी, एकोजी मुदगड, बोटकुळ, हालसी तुगाव, हालगरा, तर दुपारी 1 ते 4 यादरम्यान महीला भ. मं. तलमोड., गुरूवार दि. 3 रोजी घाटगेवाडी, सोनखेड, बोरसुरी, तलमोड, तुगाव ( ना.), बामणी, तुकाराम व नाथ भ. मं. तुरोरी, शुक्रवार दि. 4 रोजी गोकुळाष्टमी - कराळी, मळगीवाडी, जगदाळवाडी  या गावातील भजनी मंडळांची भजन सेवा होणार आहेत. शनिवार दि. 5 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत किर्तन सेवा होऊन लाहीकाल्याने कार्यक्रमाची सांगता होणार असून नंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. 

श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री गुरु सेवाधारी, श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान भक्त परिवार, परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top