धाराशिव (प्रतिनिधी)-  संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 731 व्या पुण्यतिथीनिमित्त धाराशिव शहरातील माळी गल्ली येथे धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

संत शिरोमणी सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून भक्ती, कष्ट, प्रामाणिकपणा, समता आणि मानवतेचा संदेश समाजाला दिला. साधी राहणी व उच्च विचारसरणी यामुळे संत सावता महाराजांचे जीवनकार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत सावता महाराजांनी दिलेला समता, सामाजिक एकता आणि मानवतेचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.  या कार्यक्रमास राम माळी, अरुण माळी, बालाजी माळी, जनार्धन माळी, अमर माळी, आदित्य माळी, शिवकुमार माळी, शिवराज माळी, विवेक माळी, अविनाश माळी यांच्यासह माळी समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.


 
Top