तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील तत्कालीन सहदुय्यम निबंधक बालाजी मादसवार यांची पदोन्नती होऊन छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा निबंधक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी विशाल जगदाळे यांनी तुळजापूर सहदुय्यम निबंधक कार्यालयाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दि. 4 ऑगस्ट रोजी विशाल जगदाळे यांनी पदभार स्वीकारला. तुळजापूर येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणीची कामे होत असल्याने या कार्यालयाचा कामकाजाचा व्याप मोठा आहे. विविध प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारांसह रजिस्ट्य्रांची संख्या मोठी असल्याने सहदुय्यम निबंधकपद हे महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी येथे झालेल्या अनेक  बनावट रजिस्टर बाबत लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे समजते त्यामुळे तुळजापूर कार्यालयाचा मोठा कामाचा व्याप लक्षात घेता, नागरिकांची कामे वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी नव्या सहदुय्यम निबंधकांकडून कार्यक्षम कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 
Top