तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे रुग्णालयात जन्मलेल्या सर्व नवजात बाळांसाठी बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच बाळांच्या मातांना म्हणजेच आपल्या भगिनींना भावाकडून साडीची भेट देण्यात आली. या उपक्रमातून नवजात बाळांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास बबलू कदम, किरण कदम, गोविंद लोंढे, दुर्गादास कदम, अमोल लोंढे, मारूती गवते, शहाजी हाके, अंकुश पाटील, गौरव साळुंखे, पांडुरंग शिंदे, लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण पाटील, संभाजी नेपते, दादा लोंढे, रमेश चिवचिवे, पृथ्वीराज मलबा, गितेश जेवळीकर, स्वप्निल सुरवसे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अमोल जाधव यांच्या या उपक्रमातून सामाजिक कार्याला नवी दिशा मिळावी आणि भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
