धाराशिव (प्रतिनिधी)-  स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले, गवळी गल्लीतील, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळ यांनी शिवछत्रपती विश्व सन्मानदिन  सोहळा साजरा केला. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून जुलमी, अन्यायी, अत्याचारी, राजवटी विरुद्ध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारे, आणि रयतेच्या सुखासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, मुस्तदीगिरी, धैर्य , धाडस, स्वराज्याची निष्ठेची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक आग्रा सुटकेच्या पराक्रमाला 360 वर्षे पूर्ण होत आहेत . या प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराज यांच्या जीवनातील, इतिहासातील एका सुवर्णक्षणाचा स्मृती प्रित्यर्थ शिवछत्रपती विश्व सन्मानदिन मोठ्या उत्साहात साजरा केला .

छत्रपती शिवाजी महाराजांचे  औरंगजेबाच्या कडक नजर कैदेतून स्वतःचे आणि बाल शंभूराजे यांची अत्यंत शिताफीने सुटका करून घेतली तो दिवस 17 ऑगस्ट 1666 होता. आज या 17 ऑगस्ट 2026 रोजी आज या ऐतिहासिक आग्रा सुटकेच्या पराक्रमाला 360वर्षे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व शंभू महाराज यांचा धर्मवीर, स्वराज्याशी एकनिष्ठ मावळे सरदार सेनापती या सुटकेच्या प्रसंगातील हिरोजी फर्जद व मदारी मे मेहतर या दोन एकनिष्ठ सरदार मावळे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज शंभूराजांच्या पेटाऱ्यातून बाहेर पडत असलेला शब्दाने प्रा. गवळी व प्रा.हुच्चे यांनी सांगितले. मंडळांनी या धाडसी प्रसंगाचीआठवण करून दिली गेली. यशस्वी करण्यासाठी दुर्गेश दिवटे, विश्वास दळवी, वरून साळुंखे ,बसवेश्वर पाळणे यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी या विश्व सन्मान दिनाच्या नियोजन  केले. प्रा. गजानन गवळी, मूर्तिकार काशिनाथ दिवटे, संजय पाळणे, मनमत पाळणे, साप्ते, अतुल ढोकर नंदकुमार हूच्चे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाले. 

मंडळाने गणेशोत्सवामध्ये 1964 पासूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक प्रसंग देखावे बनवून आदर्श राजांचा जीवन इतिहास हलते देखावे. मूर्तिकार श्री काशिनाथ दिवटे व त्यांचे सर्व सहकारी दिवटे यांच्या बोटातील कलेनी दाखविले आहे. बिना साच्याच्या व हलत्या मुर्त्या बनवून देखावे केले गेले आहेत. या कार्यक्रमाचे संचलन प्रा. भालचंद्र हुच्चे व राजकुमार दिवटे यांनी आभार मानले .शोभेची दारू व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व जयघोष व लेझीमच्या खेळाने समारोप करण्यात आला.

 
Top