तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे डॉ. साक्षी पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीच्या निमित्ताने आयोजित मंगळागौरीच्या पारंपारिक खेळाचा आनंद घेण्यासाठी महीलांनी प्रचंड गर्दी केली होती.
मंगळागौरीच्या पारंपारिक खेळाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित केला होता. यावेळी महिलांच्या पथकाने मंगळागौरीच्या पारंपारिक विविध खेळांचे सादरीकरण करून उपस्थित महीलांची मने जिंकली.यावेळी नयना वाघ, धनश्री ताड, वृषाली दंडनाईक, रंजना राठोड, विद्या माने, प्रीती कदम, रेणुका इंगोले, स्वाती सरडे, मनीषा केंद्रे, सुनीता गुंजाळ, निशिगंधा पाटील, दिपाली घेवारे, अक्षता हाजगुडे, गितांजली साळुंके, सुनिता पांचाळ, लतिका पेठे, स्वाती देशमाने, जयदेवी शिराळ, राजकन्या काळे, पूजा देशमाने, नसिम मुलांनी, मिरा जाधव,मुमताज तांबोळी,मंगल जाधव व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

