तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावण सोमवार व नागपंचमीनिमित्त सिंदफळ स्थित श्री मुद्गलेश्वर मंदिरात नागेश्वर अवतारातील शिवपूजा मांडण्यात आली होती.
दर श्रावण सोमवारी भक्तांसाठी महादेवाची विविध आकर्षक रूपांतील पूजा मांडण्यात येते. या उपक्रमामुळे परिसरातील शिवभक्तांना भक्तिभावाने महादेवाचे विविध रूपांचे दर्शन घेण्याची संधी मिळते.
