धाराशिव (प्रतिनिधी)-   तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी विभागातील तृतीय व अंतिम वर्षाच्या बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स या विषयांवर सहा महिन्यांचा इंटर्नशिप व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. एन्क्टी टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा संस्थेतील एकूण 86 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन एन्क्टी टेक्नॉलॉजी पुणे येथील शार्दुल भोसले आणि  अतिश जाधव यांनी केले. फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती माने, प्रा. संदीप नलगे, प्रा. रोहिणी टेकाळे आणि प्रा. ऋषिकेश हिंगमिरे यांनी या संपूर्ण इंटर्नशिप कार्यक्रमाचे समन्वय व नियोजन केले. प्रा. अल्मास शेख आणि प्रा. अक्षता हजगुडे यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे महत्त्व, त्यातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी आणि प्लेसमेंटमधील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. सध्याच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत फार्मसी क्षेत्रासोबतच मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्ससारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये मिळावीत, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता, असे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास ॲलाइड फार्मास्युटिकल लिमिटेडचे एचआर प्रतिनिधी पाटोळे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने, सर्व विभागप्रमुख व विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top