भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम यांच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दिनांक 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

या रॅलीचा प्रारंभ संस्थेचे उपसचिव आणि कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एस शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला .या रॅलीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही रॅली कॉलेज ते गोलाई चौक, तहसील मार्गे नगरपालिका आणि लक्ष्मी रोडने कॉलेज कडे रवाना झाली .या रॅलीप्रसंगी देशभक्तीपर पथनाट्य आणि नेत्र दीपक लेझीम चे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सौ. ज्योती चव्हाण मॅडम, तहसीलदार श्री जयवंत पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी सौ जगदाळे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री साळुंखे साहेब, तसेच ही रॅली यशस्वी पणे पार पाडण्यासाठी एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा. काळे जी सी,  क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सूर्यवंशी एम जी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राठोड एम पी. प्रा. माने सर प्रा. टोंगारे सर प्रा. चव्हाण मॅडम, प्रा.पिंपरे मॅडम, प्रा.. गायकवाड सर प्रा.नाईक मॅडम इत्यादीने परिश्रम घेतले.. कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार  देऊन, रॅलीची कॉलेजमध्ये सांगता करण्यात आली.


 
Top