परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा युवामोर्चाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गणेश इंगळगी यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे भेट दिली.यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत युवामोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे आणि युवामोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी परंडा न.प.उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, सुखदेव टोंपे, नगरसेवक अकिब पठाण, प्रसार माध्यम संयोजक निशिकांत क्षिरसागर, बाबासाहेब जाधव, तुषार नेटके, नागेश गर्जे, प्रमोद लिमकर, रामेश्वर चोबे, अभिषेक चोबे, राहुल फले, किरण कवटे, योगेश डांगे, धनंजय काळे, मनोहर पवार, अजिम हन्नुरे, सिध्दीक हन्नुरे, गौरव पाटील, आकाश मदने, व्यंकटेश दिक्षित तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top