धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था असल्याचे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले.
भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 39 वी वार्षिक सभा रविवारी पुष्पक मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते u,सहायक निबंधक डॉ. माधव अंबिलपुरे, संस्थेचे मुख्य प्रवर्तक पी. एन. चव्हाण, आर. एस. देशमुख, नरसिंग ताटे, सचिव अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष शशिकांत पडवळ, संचालक बालाजी तांबे, विजयकुमार कुलकर्णी, रवींद्र शिंदे, विलास खरात, अमोल सरवळे, उत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब नरवडे, ललिता लोमटे, सिंधू कांबळे, विना अनुदानित संघटनेचे नेते बिभीषण रोडगे, जयपाल शेरखाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार काळे यांनी आपल्या भाषणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर भाष्य केले. जुनी पेन्शन योजना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण सभागृहात सतत आवाज उठवत असल्याचे ते म्हणाले. भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वाटचाल प्रेरणादायी आहे. पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट कामकाजामुळे सतत अ वर्ग दर्जा असलेल्या या पतसंस्थेने कर्जमाफी योजना अंमलात आणून मोठे कार्य केले आहे. खऱ्या अर्थाने सभासदांच्या हिताचे रक्षण करणारी ही पतसंस्था आहे अशा शब्दांत आमदार विक्रम काळे यांनी गौरव केला.
यावेळी एम. डी. देशमुख , पी. एन. चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आणि सेवानिवृत्त सभासदांचा उल्लेखनीय कार्याबद्दल आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सभासदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संस्थेचे सभासद कै. नंदकुमार शाहूराज सूर्यवंशी यांना संस्थेच्या कुटुंब कल्याण निधीच्या व्याजातून 12 लाख रुपये मदतीचा धनादेश त्यांच्या वारसदार श्रीमती सविता नंदकुमार सूर्यवंशी यांना देण्यात आला. तसेच संस्थेचे सॉफ्टवेअर इंजिनिअर संतोष पाटील यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी सुजाता संतोष पाटील यांना 15 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे संचालक बालाजी तांबे यांनी केले. अहवाल वाचन सचिव अमरसिंह देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मान्यवरांचा सत्कार
भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सेवानिवृत्त सभासद संजय पाटील, दिनकर पोवळे, सुरेश टेकाळे, राजाभाऊ आगळे, महादेव कांबळे, राजेंद्र मडके, नरेंद्र वीर, कृष्णदेव मुंढे, प्रभाकर घाटुळे, रमेश कांबळे, राधा जाधव, द्वारकानाथ एडके, चंद्रकांत माळी, तुकाराम कदम, श्रीकृष्ण गुरव, गोवर्धन हरभरे, बिभीषण कटकधोंड, अनुराधा कुलकर्णी, सुरेश इंगळे, सुभाष लोमटे, बाळासाहेब नरवडे, संभाजी गायकवाड, शिवाजी वाघमारे, मीना गव्हाणे, राजकुमार वडवे, सदाशिव काळे, सतीश निकम, शिवाजी काकडे, शशिकांत आनंदे, बाळू कर्णावार, दामोदर वाघमारे, सत्यभामा जाधव यांचा आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.