धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना समाजातील दात्यामार्फत विद्यार्थी कल्याण विभागामार्फत गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था मुख्याधिकारी आदित्य पाटील प्रमुख पाहुणे लेखापाल वनविभाग धाराशिव प्रशालेची माजी विद्यार्थींनी विशाखा श्रीराम काकडे -मोरे, माजी विद्यार्थी पालक विमल रणदिवे यांच्या हस्ते इ.5वी ते 8 वीच्या गरजू मुली -मुलांना गणवेश वाटप करण्यात आला.

 याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे उप मुख्याध्यापक प्रमोद कदम, माजी शिक्षक एन.एल.गोरसे, कुमार निकम, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ उपस्थित होते. विशाखा काकडे हिने मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती विद्यार्थ्याच्या मनात कायम शाळेप्रती कृतज्ञ भावना असली पाहिजे असे म्हणाल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे सदस्य सुरेखा देशमाने, संगीता शिंदे, हनमंत ठेले, अतिराज शेंडगे यांनी गणवेश मिळण्यासाठी परिश्रम घेतले तसेच संदीप जगताप, धम्मपाल ओव्हाळ सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांनी मानले.


 
Top