भूम (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील संधी, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास आणि करिअर नियोजन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून धाराशिव जिल्हा (ग्रामीण) समन्वयक डॉ. शितल अलगुंडे व डॉ. नितीन पडवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भूम तालुका समन्वयक प्रा. राहुल राठोड, करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. ए. एल. डोंगरदिवे, प्रा. ए. एम. कुटे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. जी. एच. सुरवसे, वरिष्ठ प्राध्यापक टी. आर. बोराडे, के. जी. गव्हाणे, डॉ. राजश्री तावरे, प्रा. पुनम सुतार, प्रा. दीप्ती गिरी, डॉ. नंदु जगदाळे, डॉ. खराटे, डॉ. गायकवाड  तसेच करिअर संसदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयीन समन्वयक प्रा. ए. एल. डोंगरदिवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

 
Top