उमरगा (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) उमरगा शहर कार्यकारिणीची घोषणा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. विद्यार्थी हित, शैक्षणिक प्रश्न, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर कार्य करण्यासाठी वर्ष 2026-27 साठी या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. लातूर विभाग संयोजक यश आरिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
नूतन कार्यकारिणीत शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली तसेच शहर सहमंत्री म्हणून नामदेव शिंदे व ऋतुजा शिंदे यांच्याकडे शहर सहमंत्री असे दायित्व असेल. कार्यक्रमाचे औसत्य साधत लातूर विभाग संघटन मंत्री महेश भवर, धाराशिव जिल्हा संयोजक राजेश कवडे, धाराशिव दक्षिण भाग संयोजक पंकज बेळकोने, उमरगा तालुका संयोजक धनेश जाधव आणि धाराशिव शहर विद्यार्थी विस्तार पवन नरवडे यांच्या उपस्थितीत या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नव्या नेतृत्वाच्या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, राष्ट्रभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात अभाविपकडून व्यापक उपक्रम राबविले जातील, अशी माहिती देण्यात आली.
