धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.15 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.या मुख्य शासकीय समारंभात सकाळी 9.05 वाजता परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
