वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे हर घर तिरंगा आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी (राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व रेड रिबन क्लब) व ग्रामीण रुग्णालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण रॅली चे आयोजन करण्यात आले.

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर कोठावळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरवात करण्यात आली.  ग्रामीण रुग्णालय वाशी येथे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजयकुमार सूळ व वैद्यकीय कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये सर्वांना प्रा.महादेव उंदरे यांनी नशा मुक्ती,एड्स जनजागरण व क्षयरोग रोगासंबंधी शपथ दिली. रॅली च्या समारोपानानंतर महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रामेश्वर कोठावळे तर प्रमुख वक्ते म्हणून परमेश्वर तुंदारे (आय.सी. टी.सी समन्वयक) प्रा.डॉ अरुण गंभीरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नेताजी देसाई उपस्थित होते.  यावेळी बोलताना परमेश्वर तुंदारे म्हणाले की,युवकांमध्ये विविध आजाराविषयी जनजागरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एच.आय.व्ही आजाराची कारणे लक्षणे व उपाय या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.  क्षयरोग तंत्रज्ञ संतोष बनसोडे यांनी क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून लवकर निदान व लवकर उपचार होणे गरजेचे आहे असे सांगितले. कुष्ठरोग तंत्रज्ञ राजन शिंदे यांनी कुष्ठरोग होऊ नये म्हणून लाल रंगाचे न खाजणारे व न दुखणारे चट्टे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे असे सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे म्हणाले की, आरोग्य ही संपत्ती असून आजार न होण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी व निर्व्यसनी  राहून शक्यतो आहारामध्ये सेंद्रिय घटकाचा वापर करावा असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अरुण गंभीरे यांनी केले तर सुत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ दैवशाला रसाळ व आभार प्रा.डॉ पार्थराज क्षिरसागर यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ बालाजी देवकते,प्रा.डॉ अशोक अनमूलवार,प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बुधोडकर, क्षयरोग पर्यवेक्षक प्रविण हंडीबाग,बाबासाहेब नितळ यांनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.

 
Top