तुळजापूर (प्रतिनिधी)- नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांच्या पुढाकारातून माता-भगिनींसाठी पारंपरिक झोक्याच्या खेळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिला, युवती आणि लहान मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी प्रियंकाताई गंगणे यांनी नागदेवतेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सपना पांढरे, कविता शेंडगे, पल्लवी कदम, जयश्री कावरे, सोनू वाळके, उषा राठोड, प्रीती सोनवणे, सुनीता कावरे, अश्विनी दहीहंडे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top