धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई नलावडे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत नलावडे, संस्थेच्या सचिव मंजुषा नलावडे व मुख्याध्यापिका सौ अर्चना ताई शितोळे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापिका सौ. अर्चनाताई शितोळे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील नर्सरी वर्गातील विद्यार्थ्यांनी थोर स्वातंत्र्य सैनिक, नेत्यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य व कवायत सादर  केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील गुणवंत विद्यार्थ्यांना व मागील वर्षी एटीएस व डीटीएस परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. शेवटी प्रभात फेरी काढून मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top