मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा येथील श्रमजीवी अध्यापक विद्यालयात सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षात डी.एल.एड.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात संगीत शिक्षक श्री.शफी मुल्ला सर व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. भिमाशंकर सारणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगाचे संचालक, मा.श्री.मल्लिनाथ दंडगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता व अध्यापक विद्यालयाचे समन्वयक मा.श्री.दिलीप जमादार उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन लहान मुलांना शिकवण्याची कला आत्मसात करा. चांगले शिक्षक होण्याचे ध्येय ठेवा. ध्येय मोठे ठेवा आणि सातत्याने वाचन करत रहा. जितके अधिक वाचाल तितक्या प्रगतीच्या नव्या वाटा तुम्हाला सापडतील असे सांगितले.भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेले गुणवत्तापुर्ण व आदर्श शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यानी केले.
व्दितीय वर्षाच्या विद्यार्थीनी कु.जोया पठाण व कु.अंकिता सुर्यवंशी यानी प्रथम वर्षातील नुतन विद्यार्थ्याना आपल्या अनुभवातुन मार्गदर्शन केले.डी.एल.एड. अभ्यासक्रमातील शैक्षणिक अनुभव विद्यालयीन जीवन आणि अध्यापन प्रक्रियबाबत त्यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.डॉ.राम सोलंकर प्राचार्य, आदर्श वरिष्ठ महाविद्यालय उमरगा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षक हा समाज घडविणारा आणि समाजाला योग्य दिशा देणारा महत्वाचा
घटक आहे.तुम्ही केवळ एका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले नाही. तर एका अत्यंत पवित्र आणि जबाबादरीच्या व्यवसायाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. भावी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करुन समाजासह राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.शिक्षक म्हणुन आपल्या अंगी चारित्र्यसंपन्नता,प्रामणीकपणा, संयम शिस्त आणि माणुसकी ही मुल्ये असली पाहिजेत कारण विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडुन केवळ पुस्तकी ज्ञान घेत नाहीत तर शिक्षकाचे आचरणही अनुकरण करतात. म्हणुनच शिक्षकला राष्ट्रनिर्मीतीचा शिल्पकार म्हंटले जाते.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यापकाचार्य श्री धनराज हुळमजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अघ्यापकाचार्य सौ.संगीता हिंगमीरे, श्री. बळीराम माने, श्री. शरणप्पा मुलगे श्री.अलिम शेख तसेच व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यानी परीश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
