तुळजापूर (प्रतिनिधी)- संपूर्ण तुळजापूर तालुका टीबीमुक्त होईपर्यंत ही घोडदौड सुरूच ठेवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभाग व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य प्राधान्याने केले जाईल, अशी ग्वाही तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती विक्रम सिंह देशमुख यांनी ‌‘टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळ्यात केले. या' अंतर्गत तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींना रौप्य पदक, तर 22 ग्रामपंचायतींना ताम्र पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच हगलूर ग्रामपंचायतीची सुवर्णपदकासाठी निवड झाली असून, जिल्हास्तरावर तिचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख होते. उपसभापती रोहिणीताई मेलगिरी, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, पंचायत समिती सदस्य किसन देडे, वैभव मरडे आदी उपस्थित होते. त्या सोहळ्यात  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार,जिल्हा क्षयरोग केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख यांनी मार्गदर्शन केले.


‌‘संपूर्ण तालुका टीबीमुक्त करणार'

अध्यक्षीय मनोगतात सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. “संपूर्ण तुळजापूर तालुका टीबीमुक्त होईपर्यंत ही घोडदौड सुरूच ठेवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभाग व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य प्राधान्याने केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने यांनी केले. जिल्हास्तरीय पर्यवेक्षक सुनील उंडरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षयरोग पथक पर्यवेक्षक महेश पाठक, देविदास जाधव  तीर्थकर आप्पा, गुरु बेद्रे, तालुका आरोग्य कार्यालयातील तानाजी क्षीरसागर, रामानंद भिसे, विनोद मोरे, विशाल माळी, शहाजी आवटे, प्रवीण आवले, शशी साळुंखे, अजय गायकवाड, सतीश सातपुते, सुरज ढेरे, दीपक माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top