परंडा (प्रतिनिधी)- आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापिका श्रीमती नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे आणि प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणभाऊ क्षीरसागर यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. माजी आमदार ठाकूर यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
यावेळी विविध सामाजिक विषयांवर व समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सचिव राहुल आरडे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती स्वातीताई आरडे, कार्याध्यक्ष मृणाल कांबळे, महिला आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष श्रीमती तुळसाताई बनसोडे तसेच भाजपाचे युवा नेते सचिन घोडके आदी यावेळी उपस्थित होते.
