परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कार्यालयामध्ये आज रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त प्रतिमेचे पूजन रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीर दादा सुरवसे,  तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, बापू हावळे, भास्कर ओव्हाळ, भारत धेंडे, गोवर्धन शिंदे, शाम गायकवाड, बापू लोंढे, किशोर वाघचौरे, सुब्राव लोंढे पाटील, संपत लोंढे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन्‌‍ केले.

 
Top