धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथील काही लोकांनी जातीय वाद निर्माण करून मातंग समाजातील तरुणावर खोटे आरोप करीत त्यांची बदनामी केली. तसेच पवन पौळ यांच्यावर राजकीय द्वेषातून पोलिसांकडे चुकीची माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात केली आहे. त्यामुळे ती कारवाई रद्द करावी या मागणीसाठी मातंग समाजातील महिला, पुरुष व बालक यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.1 ऑगस्ट रोजी तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्याचे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली.


 
Top