परंडा (प्रतिनिधी)- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सुखदेव टोंपे, डॉ. अमोल गोफणे, धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, अमोल केमदारणे, सुजित परदेशी, तानाजी घोडके, रामदास गुडे, प्रमोद लिमकर, रणजित मिस्कीन, जयंत सायकर, धनंजय काळे, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, मिलिंद शिंदे, सिध्दीक हन्नुरे, आप्पा मदने, संतोष गायकवाड, अमर ठाकूर, जयंत भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top