तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठी पंचांगानुसार 2026 चा श्रावण मास गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाला असून शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण अमावस्येला समाप्त होईल. महाराष्ट्रात श्रावण सोमवारला भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते.
पहिला श्रावण. सोमवार 17 ऑगस्ट नागपंचमीही याच दिवशी आहे. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट, चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर, सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी पहिला श्रावण सोमवार आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा, नागाला दूध अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा आणि नागदेवतेचे स्मरण केले जाते. प्रत्यक्ष सापांना दूध पाजणे मात्र टाळावे. श्रावणातील मंगळवारी विवाहित महिला मंगळागौरीचे व्रत व पूजा करतात. या दिवशी मंगळागौरीची पूजा, आरती आणि पारंपरिक खेळांचे आयोजन अनेक ठिकाणी केले जाते.
श्रावण महिन्यात 17 ऑगस्ट नागपंचमी, 23 ऑगस्ट पुत्रदा एकादशी, 28 ऑगस्ट श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, वरलक्ष्मी व्रत, 31 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी, 4 सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी, 5 सप्टेंबर दहीहंडी, 7 सप्टेंबर अजा एकादशी, 11 सप्टेंबर श्रावण अमावस्या अमावस्या व पोळा असे सण असतात.
श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व असुन, श्रावण महिना भगवान महादेवाला समर्पित मानला जातो. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, बेलपत्र, धतुरा, फुले आदी अर्पण करून शिवपूजा केली जाते. श्रावण हा केवळ धार्मिक सणांचा महिना नसून महाराष्ट्राच्या लोकजीवनातही त्याला मोठे महत्त्व आहे. पावसाळ्यामुळे निसर्ग हिरवागार होतो. मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, पारायण, अभिषेक, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.