तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणा व तत्परतेचे दर्शन घडले. दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी ड्युटीवर असताना सुरक्षा रक्षक युवराज फडके यांना एक पॉकेट आढळून आले. त्यांनी तत्काळ ते मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले.

पॉकेटची पडताळणी केली असता त्यामध्ये 15,758 रोख रक्कम, एक  कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. मंदिर प्रशासनाने संबंधित भाविक महिलेचा शोध घेऊन आवश्यक पडताळणी केल्यानंतर पॉकेट त्यातील सर्व साहित्यांसह सुरक्षितपणे परत केले. सदर भाविक हैदराबाद येथील रहिवासी असून, हरवलेले पॉकेट त्यातील सर्व साहित्यांसह परत मिळाल्याबद्दल त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, सुरक्षा विभाग आणि संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मंदिर सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके,  सुरक्षा निरीक्षक प्रशांत अलकुंटे तसेच योगेश फडके उपस्थित होते. सुरक्षा रक्षक युवराज फडके यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


 
Top