धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका पदाधिकारी तसेच विविध सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वितरण, पदग्रहण सोहळा, आढावा बैठक व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदांवर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्ह्यातील विविध सेलच्या कार्यकारिणी तसेच सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी पूर्ण करण्यात आल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. कार्यक्रमादरम्यान विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण, नियुक्तीपत्र वितरण आणि सत्कार करण्यात आला. तसेच काही मान्यवरांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास विश्वास शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धीरज पाटील, धनंजय राऊत, स्मिताताई शहापूरकर, राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, दयानंद पाटील, सिराज मोगल, अरविंद बेडगे, अप्पासाहेब शेळके, अर्जुन बिराजदार, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, नानाराव भोसले, मिलिंद गोवर्धन, शिवाजी गायकवाड यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
