तुळजापूर (प्रतिनिधी)- भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम राष्ट्रीय गीत ‌‘वंदे मातरम' सादर करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत ‌‘जन गण मन' आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‌‘जय जय महाराष्ट्र माझा' सादर करण्यात आले.

यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.


वृक्षप्रसाद योजनेचा आजपासून प्रारंभ

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ‌‘वृक्षप्रसाद योजना' आज, दि. 15 ऑगस्ट 2026 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत भाविकांना वृक्षप्रसादाच्या स्वरूपात रोप देण्यात येत आहे. भाविकांनी हा वृक्षप्रसाद स्वीकारून शक्य असलेल्या ठिकाणी त्याचे रोपण व संगोपन करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top