धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव, इंटरनॅशनल जस्टीस मिशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव या ठिकाणी प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षण उद्घाटन भाग्यश्री पाटील सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या हस्ते झाले. 

यावेळी शिला पठत इंटरनॅशनल जस्टीस मिशन एड. तृप्ती पाटील, तत्त्वशील कांबळे,अधिकार मित्र मिथुन जोगदंड, प्रशांत मते,सुरज बनसोडे, सुरज पवार उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणासाठी ऑफलाइन व ऑनलाईन उपस्थित होते. वेठबिगार व बालमजुरीचे समूळ उच्चाटन धाराशिव जिल्ह्यातून व्हावे याकरिता जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव सतत कार्यरत असून, त्या बाबतीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सखोल ज्ञान व्हावे याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना न्या.भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, अजूनही बालमजुरी व वेठबिगारी प्रथा सुरू आहे व त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. या प्रथेमुळे बालकांचे शिक्षण थांबले आहे. तरीही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. यावेळी तत्त्वशील कांबळे, इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या शिला पठत व एड. तृप्ती पाटील यांनी बालमजुरी व वेठबिगारी कायदे विषयी मार्गदर्शन केले. 

 
Top