धाराशिव (प्रतिनिधी)- 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ,  वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास दीडशे वर्ष झाल्याबद्दल गवळी गल्लीतील , धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्यावतीने हर घर तिरंगा व राष्ट्रध्वज ,राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता जनजागरण रॅली काढण्यात आली .रॅलीमध्ये अत्यंत उत्साहाचे, प्रसन्नतेचे, आनंदाचे व जोश पूर्ण वातावरणाची निर्मिती लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत महिला व पुरुषांच्या सहभागातून दिसला .

या रॅलीत अत्यंत आकर्षक असे हर घर तिरंगा मुला मुलीने राष्ट्रध्वज हात हातात घेऊन डोलत व विविध घोषणाने वातावरण दम दमून गेले होते. प्यारा ओलंपिक या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध खेळातील खेळाडूंने विविध पदक मिळवून भारताची शान व मान उंचावली याबद्दल अभिनंदन केले. स्वातंत्र्य  समता,व बंधुता या उद्देशाने भारतीय संविधानाचे महत्त्व जाणवले आहे.

हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी श्री गणेशाची पूजा विधी व आरती प्रा. गजानन गवळी, काशिनाथ दिवटे, मनमत पाळणे ,राजकुमार दिवटे, शिवछत्रपती पुरस्कार व गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेल्या व मंडळाचे संस्थापक सदस्य यांच्या शुभहस्ते श्री गणेश व तुळजाभवानी माता व भारत माता राष्ट्रध्वजाची पूजा विविध आरती व श्रीफळ वाढवून केली गेली. गिरीश पाळणे ,राम पाटील, विश्वास दळवी, वरूण साळुंखे, दुर्गेश दिवटे शुभ हस्ते संपन्न झाल्यानंतर हातामध्ये राष्ट्रध्वज, तिरंगा फुगे व तिरंगा चक्र हातामध्ये घेऊन व भारत माता की जय ,वंदे मातरम, जय जवान जय किसान, मातीला नमन= वीराना वंदन, गणपती बाप्पा मोरया ,छत्रपती शिवाजी महाराज की जय,आई राजा उदो उदो, हर हर महादेव,अशा विविध घोषणाने प्रभाग आनंदी वातावरणामध्ये व अत्यंत जोश पूर्ण घोषणा जयघोषात काढण्यात आली. आपला राष्ट्रध्वज तिरंगा व राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा भक्ती व श्रद्धा या रॅलीतून अर्पण करीत असलेले चित्र  दिसत होते.

 मंडळ धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 62 वर्षापासून समाजसेवेचे व राष्ट्रभक्तीचे, भारतीय संस्कार व संस्कृती एकजूटीचे कार्य करीत आले आहे. मंडळाने 62 वर्षाच्या या कालावधीमध्ये समाज प्रबोधनातून,  विविध देखाव्यातून ऐतिहासिक, धार्मिक, अध्यात्मिक, पौराणिक  सामाजिक ज्वलंत घटना व प्रसंगातून दाखविण्यात व प्रबोधन करण्यात अग्रेसर राहिलेला आहे. ईश्वरी पाळणे, पंढरपूरे भगिनी,  आराध्या हुच्चे,सई चव्हाण व खांडेकर बंधू  यांनी प्रतीज्ञा व रॅलीतून भारतीय राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी मुला मुलींच्या विविध स्पर्धा चित्रकला, गायन, देशभक्तीपर इत्यादी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेण्यात आले.वंदे मातरम सामुदायिकरीत्या म्हटले गेले .मंडळ आपल्या या कार्यातून येणाऱ्या नवीन पिढीला राष्ट्रभक्ती, श्रद्धा, निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत आले आहे. मुला मुलींना त्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देऊन, अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचे  कार्य मंडळ करीत आहे. राष्ट्रीय जन जागरण फेरीचे संचलन प्राचार्य भालचंद्र हुच्चे यांनी केले व राजकुमार दिवटे यांनी आभार मानले. या जनजागृतीचे समारोप शोभेची दारू व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये करण्यात आला.


 
Top