तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथे विविध विकास कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत यांनी पहाणी केली.
केत यांनी श्री संत गोरोबा काका मंदिर येथे चालू असलेल्या कामांची व कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू असून त्याची पहाणी केली.यावेळी उपविभागीय अभियंता विवेक देशमुख, सहाय्यक अभियंता वर्ग 2 ओंकार जोशी, जयेश कदम,पद्माकर फंड, भास्कर माळी, विठ्ठल लामतुरे आदी उपस्थित होते.
