भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा.) ता. भूम जि. धाराशिव येथे आय. के. एस. कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याने परिपूर्ण असलेल्या स्कूल किटचे वाटप करण्यात आले. तसेच आय. टी. एस. ई. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान यादव,माजी अध्यक्ष शिवदास लोकरे,सदस्य मधुकर महानवर, अमोल उबाळे, अजमेर सय्यद,शिवहारी महानवर, नितीन महानवर,प्रकाश महानवर, गणेश महानवर, सूरज चव्हाण, रोहित महानवर, अशोक शिंदे,बाळासाहेब खरात, राहुल महानवर, विकास महानवर, प्रमोद कांबळे, तर माता पालकमध्ये उषा कुलकर्णी (अंगणवाडी सेविका), पूजा कांबळे, मंजुषा शिंदे, मंजुळा यादव, स्वाती महानवर, मालन महानवर, अश्विनी  महानवर,नर्मदा महानवर अरुणा कांबळे, स्वाती यादव,रोहिणी हाळनोर ,इत्यादी पालकांची उपस्थितीमध्ये कार्यक्रम संम्पन झाला.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध व्हावे, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णा मारुती महानवर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाथरूड केंद्राचे केंद्रप्रमुख भागवत तसेच केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक पोतरे एम डी व आभार प्रदर्शन सहशिक्षिका धनलक्ष्मी पोतरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. 

 
Top