धाराशिव (प्रतिनिधी)- नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाइन धाराशिव व माता रमाबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धाराशिव येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. धुमाळ एन. पी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विविध स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये दिनांक 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली, स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच 14 ऑगस्ट रोजी हरित धाराशिव उपक्रम अंतर्गत वृक्षारोपणामध्ये एन . एस.एस.विभागांतर्गत सहभाग नोंदवण्यात आला यावेळी माता रमाबाई कला वाणिज्य व विज्ञान येथील प्राचार्या डॉ. शैलजा पैकीकर तसेच नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाइन, धाराशिव येथील प्राचार्या वृषाली भोसले, उपप्राचार्य मीना गडेराव सर्व सहकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 
Top