परंडा (प्रतिनिधी)- “हातात तिरंगा, ओठांवर भारतमाता की जय, वंदे मातरम्, च्या घोषणा देत परंडा शहर व तालुक्याच्या वतीने देशप्रेमाचा जागर करून हि तिरंगा रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना आज परंडा शहर व तालुका राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीमध्ये परंडा शहर व तालुक्यातील असंख्य देशप्रेमींनी सहभाग घेऊन, आपल्या लाडक्या तिरंग्याला मानाचा मुजरा केला. या रॅलीचा शुभारंभ शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथून झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. आपल्या तिरंग्याचा, स्वाभिमान आणि अस्मितेचा सन्मान करण्यासाठी हजारो देशप्रेमी या रॅलीत सहभागी झाले होते तसेच कमांडो करिअर ॲकडमीचे सर्व विद्यार्थी आणि शहरातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 
Top