उमरगा (प्रतिनिधी)- राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तरुणांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश देण्यासाठी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशप्रेमाची भावना मनात जागवत विद्यार्थी, माजी सैनिक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. 'भारत माता की जय', ‘वंदे मातरम' अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
उमरगा शहरात मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.11) आयोजित रॅलीची सुरुवात श्रमजीवी कॉलेज येथून करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी, माजी सैनिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली हुतात्मा स्मारक येथे पोहोचली. तेथे हुतात्म्यांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तरुणांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. विशेषतः विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी रामकृष्णपंत खरोसेकर, मुरलीधर मुगळीकर, कैलास शिंदे, सभापती बसवराज कस्तुरे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, माजी सभापती मदन पाटील, तालुकाध्यक्ष (ग्रामीण) प्रल्हाद काळे, अनिल सगर, गणेश अंबर, साईराज टाचले, पंचायत समिती सदस्य दगडू पाटील, सागर पाटील, अमर वाले, सतीश सुरवसे, महेश मशाळकर, चंद्रशेखर पवार, सुजित शेळके, दिलीपसिंह गौतम, सदानंद पाटील, सौ. संगिता पाटील, राजू मुल्ला, शिवलिंग माळी, संजय आमाशेट्टी, संजय बिराजदार, यशपाल कांबळे, विनोद पाटील यांच्यासह आदर्श महाविद्यालय व श्री. बसवेश्वर विद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच शहरातील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
