उमरगा (प्रतिनिधी)- शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालय विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेत 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालया समोर शनिवारी, (दि 15) सकाळी उपविभागीय दत्तू शेवाळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील, माजी खासदार रविंद्र गायकवाड, तहसीलदार गोविंद येरमे, नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, पंचायत समिती सभापती ॲड आकांक्षा चौगुले, पंचायत समिती सदस्य कैलास शिंदे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, डॉ कपिल महाजन, सुनील कुलकर्णी आदीसह स्वातंत्र्य सैनिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगरपालिका, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, तालुका कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेसह विविध शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

 
Top