तुळजापूर (प्रतिनिधी)-आषाढी अमावस्येनिमित्त सोमवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री तुळजाभवानी मंदिरात रोज  वापरण्यात येणाऱ्या विविध दिव्यांची स्वच्छता करून सायंकाळी पारंपरिक पद्धतीने दीपपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभारा तसेच सिंह गाभाऱ्यातील विविध दीप, पूजा-अर्चनेसाठी वापरण्यात येणारे दिवे, आरतीचे दीप प्रथम विधिवत स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांच्या हस्ते दीपांचे विधिवत पूजन करण्यात आले. आषाढी अमावस्येनिमित्त तुळजापूर शहरासह परिसरातील अनेक घरांमध्येही दीपांची स्वच्छता करून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. महिलांनी घरातील दीप सजवून त्यांची पूजा केली. त्यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये दीपप्रज्वलनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले.

 
Top