मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ. राम सोलंकर म्हणाले डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालयासाठी केलेले काम हे अनन्य साधारण आहे. त्यांनी दिलेली पाच सूत्रे आजही जगभर मार्गदर्शक आहेत. हे सूत्रे फक्त ग्रंथालयासाठी नाहीत ते ज्ञानाच्या प्रसाराबद्दल, लोकशाही बद्दल आणि समाजाच्या प्रगती बद्दल आहेत. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नाही तर विचारांचे, कल्पनांचे आणि नवनिर्मितीचे केंद्र आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनीआपले जीवन घडवावे असे मार्गदर्शक त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागातील ग्रंथपाल प्रा. अखिल शेख यांनी केले होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयीन कर्मचारी श्री. शरणप्पा मुलगे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. जयराम मोटे, प्रा. तात्याराव चव्हाण, प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे, प्रा. डॉ. संजय साळुंखे,  प्रा. डॉ. तानाजी पवार,  प्रा. रवींद्र जोजन, प्रा. बालाजी पिडगे, प्रा. दत्ता सूर्यवंशी, प्रा. डॉ. उमेश केसरे, प्रा. डॉ. संजय दुलंगे, प्रा. डॉ. फुलचंद पवार ,  प्रा. डॉ. संतोष होगाडे, ग्रंथालय कर्मचारी श्री. साजिद शेख विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुधीर मठपती यांनी मांडले.

 
Top