धाराशिव (प्रतिनिधी)- परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक हे शनिवार,दि.15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्यासह सकाळी 9.45 वाजता प्रशासकीय विभागांची आढावा बैठक,आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी,तुळजापूर येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सद्यस्थिती,45 मीटर उंच स्वराज्य ध्वजाचे उद्घाटन तसेच ‘हरित धाराशिव अभियान 2.0 'च्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री सरनाईक सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह,धाराशिव येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन.सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास ते उपस्थित राहतील.
त्यानंतर सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रशासकीय विभागांची आढावा बैठक होईल.यावेळी आगामी शारदीय नवरात्र महोत्सव 2026 संदर्भातील आढावा तसेच श्री क्षेत्र तुळजापूर येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता पालकमंत्री सरनाईक जिल्हाधिकारी कार्यालयातून मोटारीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे प्रयाण करतील.सकाळी 11.10 वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचून 45 मीटर उंच स्वराज्य ध्वज उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील.या कार्यक्रमाचा संदर्भ मुख्याधिकारी,धाराशिव यांच्याकडे आहे.
यानंतर सकाळी 11.30 वाजता ते धाराशिव शहरातून मोटारीने शिंगोली वनक्षेत्राकडे प्रयाण करतील.सकाळी 11.45 वाजता शिंगोली वनक्षेत्रात आगमन झाल्यानंतर ‘हरित धाराशिव अभियान 2.0' या कार्यक्रमास ते शिंगोली येथे उपस्थित राहतील.
दुपारी 1.30 वाजता पालकमंत्री सरनाईक शिंगोली वनक्षेत्रातून मोटारीने गोवर्धनवाडी,ता.जि. धाराशिवकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता गोवर्धनवाडी येथे आगमन झाल्यानंतर खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 3 वाजता पालकमंत्री श्री.सरनाईक गोवर्धनवाडी,ता.जि. धाराशिव येथून मोटारीने छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
