तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातन विविध प्राचिन स्मारके यांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम चालू आहे.आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरची गतिमान वाटचाल सुरू आहे.
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू पहाणारी जागतिक वारसा स्थळांची मोठी देणगी तेरला लाभलेली आहे.याच प्राचीन वारसास्ळळांना आता नवी झळाळी लाभणार आहे.हजारो वर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या तेर येथील स्मारकाचे जतन ,संवर्धन व विकास करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. तेर नगरीचा समृद्ध व वैभवशाली इतिहास जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी या स्थळांना जागतिक वारसा स्थळाप्रमाणे विकसित केले जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ही स्थळे विकसित करण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने मे. अजिंक्यतारा कन्सल्टंट यांच्या माध्यमातून संपूर्ण तेर गावचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार विविध विभागाच्या माध्यमातून विकासासाठी निधी पाठपुरावा करून आ.राणाजगजितसिंह पाटील उपलब्ध करून घेत आहेत.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे राज्यात सर्वात पुरातन त्रिविक्रम मंदिर असून या मंदिराच्या गभग्रहास तडे गेले होते. तर लाकडी मंडप पावसाळ्यात गळत होता.लाकडी मंडप कधी कोसळेल अशी अवस्था झाली होती.या मंदिराच्या जतन,संवर्धन व विकास कामांसाठी 2 कोटी 90 लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये गभगृहाच्या छतास व भिंतीस ग्राऊडिंग करणे, कायमस्वरूपी विद्युत योजना, सुशोभीकरण करणे, लाकडी पुन्हा नव्याने करणे, मंदिराच्या छतास भेगा पडल्यामुळे पाण्याची गळती रोखण्यासाठी गळती प्रतिबंधक योजना करणे या कामास सुरुवात करून कामही पूर्ण झाले आहे त्यामुळे राज्यातील सर्वात पुरातन मंदिर असलेल्या त्रिविक्रम मंदिराला गतवैभव प्राप्त झाले आहे.
तेर येथील पुरातन विटांनी बांधलेले दुस-,या व तिसऱ्या शतकातील विटांनी बांधलेले तिर्थकंड पडण्याचा मार्गावर होते.त्याच्या सभोवताली सीमा भित बांधणे,छत टाकणे ,स्मारकासाठी पोहोच रस्ता करणे, तिर्थकंडाचे पुरातत्व शास्त्र संकेतानुसार संवर्धन करणे यासाठी 5 कोटी 11 लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तेर येथील विटांनी बांधलेले चैत्यगृह असून सभोवताली सीमा भिंतीची दुरूस्ती, छत टाकणे,बगीचा विकसीत करणे, पर्यटकांसाठी सोयी सुविधा देणे यासाठी 2कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.व कामासही सुरूवात झाली आहे.
तेर येथील कै रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन वस्तूची पहाणी करण्यासाठी देश, प्रदेशातील पर्यटक, अभ्यासक सातत्याने येत असतात.पुरातन इमारत अपुरी असल्याने नूतन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून त्याचा शुभारंभ 2023 ला करण्यात आला आहे.पर्यटकांना जागतिक दर्जाच्या अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे.नुतन इमारतीचे कामही प्रगतीपथावर आहे.
हजारो वर्षांपासून जमिनीच्या पोटात दडलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा आता “याची डोही यांची डोळा “अनुभवला येणार आहे.तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित केली जाणार आहे.यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून 13 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे.श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरालगत तेरला येणाऱ्या भाविक भक्त व पर्यटकांची सोय व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या भक्त निवासाच्या उर्वरित कामासाठी 2कोटी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून काम प्रगतीपथावर आहे. श्री संत गोरोबा काका मंदिर व परीसर विकासासाठी 8कोटी 56 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यातून भव्य दगडी मुख्य प्रवेशद्वार, मंदिर परिसरात अंतर्गत रस्ते व त्यावर मंदिराची प्राचीन संस्कृती लक्षात घेता दगडी ब्लाक बसविणे, सागवानी लाकडी मंडप,ग्रेनाईट फरशी बसविणे, संरक्षण भिंत बांधकाम करणे, पाण्याची सोय करणे आदी बाबींचा समावेश आहे.तसेच श्री संत गोरोबा काका यांच्या पूर्वेकडील ओवरी कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तेर येथील सब स्टेशन ते श्री संत गोरोबा काका मंदिरापर्यंत रस्ता रुंदीकरण करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम करणे, मध्यभागी दुभाजकांचे बांधकाम करणे यासाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.त्यामुळे जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरची गतीमान वाटचाल सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यात पर्यटन विकास यावर आपला भर असून पुरातन मंदिरे, वास्तू, पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी विकास आराखडा तयार करून व त्यासाठी लागणारा निधी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.पुरातन मंदिरे, वास्तू ,पर्यटन स्थळे यांची माहिती सर्वत्र होण्यासाठी तसेच पर्यटक व भाविकभक्त यांची संख्या वाढत जाणार आहे यातूनच स्वयंरोजगार निर्माण करणे हा आपला मुख्य उद्देश आहे.
- आमदार राणाजगजितसिंह पाटील


