धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचे मातृसंस्था श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत शैक्षणिक, प्रशासनिक तपासणी प्राचार्य डॉ एल.जी .जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी विज्ञान,कला, वाणिज्य शाखेचे समितीकडून तटस्थपणे परीक्षण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी विभाग, सांस्कृतिक विभाग या विभागांसह सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली. ज्या विभागांमध्ये कमतरता आहेत त्या भरुन काढण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तर जे विभाग चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांना पुढील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेसाठी सामोरे जाताना वर्तमानातील शैक्षणिक प्रगतीपेक्षा अधिकची तयारी करावी लागेल. त्याचबरोबर प्राचार्य डॉ जाधव ,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कडेपूर यांनी शेवटी सांगितले की, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच प्राध्यापकांनी संशोधनपर आलेख प्रसिद्ध करावेत जेणेकरून अध्यापन पद्धती प्रभावशाली होईल. समितीमध्ये डॉ. डी.ए पवार, विक्रम देसाई, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कडेपूर तसेच डॉ.बापूराव पवार, डॉ. नेताजी काळे, तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर यांचा समावेश होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ मंगेश भोसले यांनी लेखापरीक्षण यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.
