धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्य सरकारने  पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर कर्ज  माफी योजना 2026 ची घोषणा केली. परंतु त्यात अनेक शेतकरी वंचित राहत असून, गेली तिन्ही कर्जमाफीत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन संजय पाटील दुधगावकर यांनी केले. दहा महिने चप्पल शिवाय कर्जमाफीचा लढा दिल्याबद्दल नायगाव येथील नागरी सत्कार आयोजित कार्यक्रमात दुधगावकर बोलत होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह .भ .प दिनकर बाबा महाराज,नारायण पाटील माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना शेतकऱ्यांच्या भविष्याबाबतीत चिंता त्यांनी व्यक्त केली. मागील  वर्षी पिक विमा कंपनी व शासन यांनी विविध मंडळातील शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला.

आता साखरेचे दर वाढले असून त्यामुळे कारखानदारांचा फायदा होणार आहे. मग शेतकऱ्यांना त्याचा फायदा कारखानदार देणार का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांनी एकत्र येत सोयाबीन विरोध करायला हवा असे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी दामोदर गोरे, बालाजी शितोळे, जीवन शितोळे, दत्ता शितोळे, सचिन शितोळे, परमेश्वर मेनकुदळे, संतोष गरड, प्रल्हाद शितोळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top