धाराशिव (प्रतिनिधी)- अतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित टीपीसीटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीजच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'बिल्डिंग एआय एजंट्स अँड एआय टूल्स टू ग्रो  अकॅडेमिक  परफॉर्मन्स' या विषयावर विशेष एक्सपर्ट ट्रेनिंग लेक्चरचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “एआयच्या वाढत्या वापराच्या युगात विद्यार्थ्यांना एआय एजंट्स आणि विविध एआय टूल्सची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा एक्सपर्ट ट्रेनिंग लेक्चरमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याबरोबरच त्याचा अभ्यास आणि अकॅडेमिक  परफॉर्मन्स सुधारण्यासाठी योग्य पद्धतीने उपयोग करण्याची दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी स्वतःला अपडेट ठेवून भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करावीत.“

या कार्यक्रमासाठी ऑर्डर टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पुणेचे संचालक सुरज शिंदे, डायरेक्टर, हे एक्सपर्ट स्पीकर म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एआयच्या बदलत्या युगात उपलब्ध असलेल्या विविध एआय टूल्सचा प्रभावी वापर, एआय एजंट्सची कार्यपद्धती तसेच त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

एआय एजंट्स व टूल्सची संकल्पना संदर्भात मार्गदर्शन करताना मिस्टर सुरज शिंदे यांनी एआय एजंट्स आणि एआय टूल्स यांची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. एआय एजंट्स कसे काम करतात, त्यांची कार्यपद्धती काय आहे आणि विविध शैक्षणिक कामांसाठी त्यांचा उपयोग कसा करता येतो, याबाबत त्यांनी माहिती दिली. एआय एजंट्सच्या माध्यमातून प्लॅनिंग, रिझनिंग,ऍक्शन आणि लर्निंग या प्रक्रियांचा प्रभावी वापर कसा करता येतो, याचेही त्यांनी स्पष्टीकरण केले.

यावेळी विविध एआय टूल्स फॉर टीचिंग अँड लर्निंग याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासातील संकल्पना समजून घेणे, माहितीचे विश्लेषण करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, विषयातील अडचणी समजून घेणे आणि लर्निंग अधिक प्रभावी बनविणे यासाठी एआय टूल्सचा उपयोग कसा करता येतो, याबाबत माहिती देण्यात आली.

भविष्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात एआयचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच एआयशी संबंधित नवीन तंत्रज्ञान आणि टूल्सची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे मिस्टर सुरज शिंदे यांनी सांगितले. एआयचा वापर करताना क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्हिटी आणि डिसिजन मेकिंग यांना महत्त्व देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंका व्यक्त केल्या. मिस्टर सुरज शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांना एआयच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांना एआय टूल्स आणि एआय एजंट्सच्या प्रत्यक्ष उपयोगाबाबत अधिक स्पष्टता मिळाली.

एकूणच, या एक्सपर्ट ट्रेनिंग लेक्चरमुळे विद्यार्थ्यांना 'अंडरस्टँड एआय एजंट्स अँड हाऊ दे वर्क', 'बिल्ड एआय एजंट्स फॉर ॲकॅडमिक टास्क्स', 'एआय टूल्स टू एन्हान्स टीचिंग अँड लर्निंग', 'डेटा ड्रिव्हन इनसाइट्स टू इम्प्रूव्ह ॲकॅडमिक परफॉर्मन्स' तसेच 'रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स' या विविध बाबींची माहिती मिळाली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना एआयच्या माध्यमातून स्मार्ट लर्निंग आणि ॲकॅडमिक परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्याच्या विविध संधी समजल्या.

कार्यक्रमाचे आयोजन डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज च्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख डॉ. उषा वडणे तसेच विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top