मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाची कॅडेट भूमिका शेंडगे नी अमरावती येथे पार पडलेल्या थल सैनिक कॅम्प मध्ये फायरिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात तिची निवड करण्यात आली. 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथुन भूमिकाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे .फायरिंग मध्ये महाराष्ट्राच्या संघात निवड होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. या वर्षी एनसीसी विभागानी सलग तीन वर्ष दिल्ली मध्ये होणाऱ्या कँपमध्ये कॅडेटसनी हॅट्रिक पूर्ण केली. महाविद्यालयातील आता पर्यंत मागील दोन वर्षे दिल्ली येथे गणतंत्र दिवस कँप म्हणजेच आरडीसी साठी 26 जानेवारी 2025 मध्ये वैभवी शेंडगे व 26 जानेवारी 2026 ला अर्जुन पाचंगे या दोन कॅडसनी हा विक्रम केले होता.या वर्षी भूमिका थल सैनिक कँप दिल्ली येथे फायरिंग मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.हा कॅम्प अमरावती येथे घेण्यात आला महाराष्ट्रातील सर्व एनसीसी एकूण सात ग्रुप मधून मुंबई एक, मुंबई दोन, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, व छत्रपती संभाजीनगर यातील मुले, मुलींनी या कॅम्प निवडीसाठी सहभाग घेतला होता.कोरेगाव वाडी येथील भूमिकाचे वडील ड्रायव्हर असून अतिशय गरीब परिस्थितीतून मुलीला शिक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागात प्रवेश घेण्यासाठी प्रेरित केले आणि वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण करून दाखवले.मागील सलग चार महिन्यापासून अतिशय खडतर कॅम्पमधून तिने दाखवून दिले की योग्य दिशा मार्गदर्शन, आत्मविश्वास,त्याग,मेहनत, प्रबळ आत्मविश्वास, वेळेचे नियोजन व कामावर निष्ठा असेल तर हे यश कोणी ही रोखू शकत नाही हे तिने तिच्या कार्याच्या यशातून दाखवून दिले आहे.तिच्या यशामागे नेहमी खंबीरपणे मार्गदर्शन करणारे 53 महाराष्ट्रात बटालियन एनसीसी कार्यालयाचे कमान अधिकारी करण्यात संतोष नवगण, प्रशासकीय अधिकारी कर्नल वाय बी सिंग तसेच कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,निळकंठ माने यांचे मार्गदर्शन लाभले  असून या यशाबद्दल उमरगा परिसरात तिचे सर्व दूर नावलौकिक होत आहे .पुढिल सप्टेंबर महिण्यात दिल्ली येथे होणाऱ्या कॅम्प मधुन महाराष्ट्राचे,छत्रपती संभाजी नगर ग्रुप,एनसीसी लातूर, महाविद्यालयाचे नाव देशात प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी सर्वांच्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या.या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ प्राचार्य डॉ संजय अस्वले,डॉ विनोद देवरकर,डॉ पदमाकर पिटले,कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,प्रा गुंडाबापू मोरे,प्रा शैलेश महामुनी,राजकुमार सोनवणे ,नितीन कोराळे,निळकंठ माने सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी, कॅडेटसच्या वतीने अभिनंदन करून दिल्ली कँपसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

 
Top