धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कनगरा येथील रहिवाशी विमलताई वसंतराव इंगळे (वय 88) यांचे सोमवारी (दि.24) पुणे येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.25) कनगरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक कै.वसंतराव इंगळे यांच्या पत्नी व माजी जि.प.सदस्य संजय इंगळे, राजेंद्र इंगळे, जयंत इंगळे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top