परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने परंडा शहरात काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये सहभागी बालकांना व नागरिकांना नगरसेवक अकिब पठाण आणि पठाण परिवाराच्या वतीने मंडई चौकात अल्पोपहार, मिठाई व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड, जहीर चौधरी, ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष खलीलखाँ पठाण, मा. नगरसेवक ॲड. नुरूद्दीन चौधरी, माजी नगरसेवक शब्बीरखाँ पठाण, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रमेशसिंह परदेशी, भाजयुमो शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते, नगरसेवक सत्तारखाँ पठाण, नगरसेवक मदनसिंह सद्दीवाल, नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, नगरसेवक मजहर दहेलूस, नगरसेवक इस्माईल कुरेशी तसेच माजी नगराध्यक्ष बाशाभाई शहाबर्फीवाले, ॲड. सलमान तांबोळी, जोयब हावरे, फारूखान पठाण, सिद्दीक हन्नूरे, अजिमभाई हन्नूरे, अरबाजखाँ पठाण, रियाजरखाँ पठाण, सरवरखाँ पठाण, बुरानोद्दीन पठाण, हारूनखाँ पठाण, समदखाँ पठाण, दिलावरखाँ पठाण आदी उपस्थित होते.
