धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण आणि आदरभावाने साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून महान साहित्यिक, समाजप्रबोधक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे समाजात जतन व संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली.


 
Top