जग बदल घालून घाव मला सांगून गेले भिमराव.. जातीव्यवस्थेचे चटके बसल्याने शाळा सोडून आयुष्याच्या विद्यापीठात बरंच अनुभवलेले.. मराठी सारस्वताने जातीभेदाच्या पायावर नाकारलेले समूह, विषय आणि प्रश्न पहिल्यांदाच समर्थपणे मांडणारे वास्तववादी कलावन्त...

केवळ उच्चभ्रू आणि सुंदरच असणारेच कथा, कादंबरीचे नायक-नायिका असायचे पण अण्णा भाऊंनी पहिल्यांदाच दलित, आदिवासी, भटके सौंदर्य नसले तरी शौर्य असलेले फकिरा, यंकू माकडवाला, दरवेशी याना नायक बनविले. साहित्य अकादमी पुरस्कार मिळविण्यासाठी, पैशासाठी प्रस्थापित आणि इतर दलित साहित्यिकासारखे अण्णा भाऊंची पात्रे कुठेच लाचार होत नाहीत .स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत. पुरस्काराच्या आमिषाने स्त्रियांची अब्रू जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या स्त्रीद्रोही, विचारद्रोही, आंबेडकर द्रोही विकाऊ साहित्यिक नव्हते. अण्णाभाऊंची पात्रे प्रसंगी मरण पत्करतात पण शरण जात नाहीत. स्त्री पात्रे कुठंही अवमानित न करता शिलभ्रष्ट न करता शिलवंत, नीतीवंत चित्रित केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नाळ जोडतात.. वाटेगाव ते मुबई पायी प्रवास, विविध क्षेत्रातील काम, कादंबरीकार, शाहीर, वगनाट्य, कथाकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, रशियाचा प्रवास, लोक प्रबोधन, कॉम्रेड..  

35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 14लोकनाट्य, 10 पोवाडे, 02 नाटके, एक प्रवासवर्णन आणि सात कादंबऱ्यावर आधारित सात चित्रपट निघूनही मराठी सारस्वतांनी उपेक्षित ठेवलेला महान साहित्यिक... 

अण्णा भाऊ साठे यांच्या विद्रोही स्मृतीस विनम्रअभिवादन !

डॉ. रमाकांत पाटील, 

धाराशिव, 

महाराष्ट्र.


 
Top