धाराशिव (प्रतिनिधी)- तुलसी महिला मंडळ बीड संचलित नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन व माता रमाबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जुलै 2026 रोजी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन केले होते.
हा प्रोग्राम शैक्षणिक वर्ष 2026 27 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सोमनाथ लांडगे व सौ आदिती कुलकर्णी सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शैलजा पैकेकर व प्रोफेसर वृषाली भोसले मॅडम व उपप्राचार्य मीना गडेराव या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्राध्यापक उमेश कांबळे व प्राध्यापक शैला करपे यांनी केले. तसेच गुरुजनवर्गांनी शिष्यवृत्ती विषयक, करियर विषयक, मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी दोन्ही कॉलेजचे कर्मचारी व पालक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
